प्रत्येक परिणामाला कारण असते आणि प्रत्येक कारणाचा एक विशिष्ट परिणाम होणे हे अपरिहार्य आहे. यश हा अपघात नाही, तर तो जाणीवपूर्वक केलेल्या कामाचा परिणाम असतो.
आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल, तर यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुण आपण अंगी बाळगायला हवेत. त्याचप्रमाणे अयशस्वी व्यक्तिमत्त्वात असणारे मूलभूत दोष दूर करायला हवेत. त्यासाठी उच्च परिणाम साधणारी मनोधारणा असणे आवश्यक आहे आणि ती मिळविण्यासाठी उपयोगी पडतील अशा सात पायऱ्या आज आपण बघणार आहोत नव्हे तर त्या चढून आपण सर्वजण यशस्वी होणार आहोत.
१) प्रबळ इच्छाशक्ती : इच्छा ही प्रत्येक कृतीचा...