प्रत्येक परिणामाला कारण असते आणि प्रत्येक कारणाचा एक विशिष्ट परिणाम होणे हे अपरिहार्य आहे. यश हा अपघात नाही, तर तो जाणीवपूर्वक केलेल्या कामाचा परिणाम असतो.
आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल, तर यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुण आपण अंगी बाळगायला हवेत. त्याचप्रमाणे अयशस्वी व्यक्तिमत्त्वात असणारे मूलभूत दोष दूर करायला हवेत. त्यासाठी उच्च परिणाम साधणारी मनोधारणा असणे आवश्यक आहे आणि ती मिळविण्यासाठी उपयोगी पडतील अशा सात पायऱ्या आज आपण बघणार आहोत नव्हे तर त्या चढून आपण सर्वजण यशस्वी होणार आहोत.
१) प्रबळ इच्छाशक्ती : इच्छा ही प्रत्येक कृतीचा उगम असतो . आपले उद्दिष्ट गाठण्याची प्रेरणाच प्रबळ इच्छेतून निर्माण होत असते. महान तत्त्वज्ञानी नेपोलियन हिल यांनीही म्हटले आहे, की माणसाचे मन ज्या कल्पना करते त्याच्यावर त्याची श्रद्धा बसते आणि नंतर तो ते करूनही दाखवितो. प्रबळ इच्छा हीच सर्व ध्येयप्राप्तीची सुरवात असते. छोटी ठिणगीच पुढे जाऊन मोठा वणवा निर्माण करते. कमकुवत इच्छा मात्र काहीच करू शकत नाही.
२) वचनबद्धता : सचोटी आणि शहाणपण या दोन मजबूत खांद्यावरच वचनबद्धता उभी राहू शकते. शहाणपण म्हणजे अवास्तव शब्द न देणे. सचोटी म्हणजे दिलेला शब्द पाळायचा.
आणि मुळातच मूर्खपणाचा शब्द न देणे म्हणजे शहाणपणा. यश हे आपले विचार आणि निर्णय याचं फलित असत. ज्ञान म्हणजे प्रचंड सामान्यज्ञान, तर शहाणपण म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा उचित वापर.
३) जबाबदारी : एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे नेहमीच अवघड वाटत असते. त्यामुळेच बरेच लोक आपल्याला ठराविक मर्यादा घालून घेतात आणि कोणतेही जबाबदारी न स्वीकारताच सर्वसाधारण निष्क्रिय आयुष्य जगत असतात. अशी माणसे चमत्कार घडविण्यापेक्षा चमत्काराचीच वाट पाहत आपले आयुष्य घालवीत असतात.यशस्वी होण्यासाठी जबाबदारी घेणे खूप आवश्यक गोष्ट आहे.
४) कठोर परिश्रम :- यश मिळवायचे असेल, तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही. उत्कृष्ट कामगिरी ही काही अपघाताने होत नाही. त्यासाठी तयारी आणि प्रत्यक्ष काम यांची आवश्यकता असते. प्रत्येकाला यशस्वी व्हायची इच्छा असते; परंतु त्यासाठी श्रम घेण्याची, वेळ देण्याची तयारी फारच थोड्या लोकांची असते. स्वप्न पाहणे आवश्यक आहे; परंतु त्याचबरोबर त्या स्वप्नाची पायाभरणी करण्यासाठी श्रमही घ्यायला हवेत. त्यासाठी दिशा, समर्पण, निर्धार, शिस्त आणि कालमर्यादा ही पायाभरणी आहे. यामुळेच स्वप्नाचे रूपांतर सत्यात करता येते.
५) सकारात्मक श्रद्धा/विश्वास : सकारात्मक विश्वास हा सकारात्मक विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल, असं निश्चितपणे वाटणे म्हणजे सकारात्मक विश्वास. नुसत्या इच्छेला किंवा स्वप्नांना येथे वावच नसतो. सामना हा पराभव टाळण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच, खेळण्याची जिद्द हा सकारात्मक विश्वास देते.
६) सातत्य :- सातत्य म्हणजे आपण ठरवलेल्या ध्येयावरची निष्ठा.म्हणजेच हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत अविचल प्रयत्न करण्याची तयारी, अविश्रांत प्रयत्न करणे.एडिसनने दिव्याचा शोध लावण्यासाठी हजार अपयश पचवलीत. प्रत्येक प्रयत्नाकडे अपयश म्हणून न बघता एका अयोग्य मार्गाचा शोधच मला लागला, ही जिद्द बाळगली. अपयशी माणसांची सुरवात तर उत्तमच असते; परंतु ते शेवटी गडबडतात, थकतात आणि प्रयत्न थांबवतात. योग्य हेतूमधूनच सातत्य निर्माण होते. हेतूच जर पक्का नसेल तर आयुष्य कच खाते, घसरडे, निसरडे होते.
७) कामगिरीचा अभिमान, गर्व : आपण अंगीकारलेल्या कामात सन्मान असला तरच त्यातून उत्कृष्टता निर्माण होते. कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. यात नम्रता आणि आनंद असतो. माणसाची गुणवत्ता आणि त्याच्या हातून घडणाऱ्या कामगिरीची गुणवत्ता या अविभाज्य गोष्टी आहेत. साशंक हृदयाने केलेले प्रयत्न अर्धवट नाही तर शून्य परिणाम साधतात. प्रत्येक कामगिरी ही त्या माणसाचे स्वतःचे चित्रच उभे करत असते. मग त्याचे काम काही का असेना; कार धुणे, अंगण स्वच्छ करणे किंवा घराला रंग देणे. माणसाचा दर्जा कामाने नाही तर ते काम तो कशा पद्धतीने करतो, त्यावर ठरत असतो. उत्कृष्टता ही आतून येत असते आणि तीच विजेत्याचे रूप घेत असते...

0 comments:
Post a Comment