जीवनाचे हे चक्र असते
सुख-दु:खा सोबत जगायचे असते
सुखाला ही दु:खात बघायचे असते
दु:खात ही सुख जाणवायचे असते
प्रयत्नांना यश असते
विचारांना ही भ्रम असते
शब्दांना ही कोडे असते
जगणाऱ्याचे प्राण असते
जीवनाचे हे चक्र असते
सत्याला ही फटके असते
पाप्याला ही साथ असते
फुलांना ही क्षणिक सुख असते
आठवणीत ही सौदर्य असते
जीवनाचे हे चक्र असते
ओझे वाहून न्यायचे असते
0 comments:
Post a Comment