तुझ्याच प्रेमामध्ये
स्वत:ला विसरतो
जाग असतानाही
स्वप्नांच्या दुनियेत जातो
स्वप्नात पाहतो मी तुला
तुझ्या निरागस चेहर्याला
तेव्हा समजावतो नयनांना
सांभाळा माझ्या स्वप्नाला
तुझ स्मित असच टिकू दे
त्यात माझाच स्वार्थ आहे
कारण माझ्या स्वप्नांचा
तोच रहस्यार्थ आहे
माझ्या चेहऱ्यावरील स्मितासाठी
तुझ स्मित असच टिकाव
तुझ्या सुखासाठी वाटतंय मला
रडताना हसायला शिकावं
जेव्हा दिसतेच तू मला
एक गोड स्वप्न वाटते
होतेस नजरेआड जेव्हा तू
स्वप्नात पाणी होऊन कंठात दाटते
0 comments:
Post a Comment