जीवनाच्या प्रवासात
खूप काही मिळवायचं असतं
वास्तवातून वेगळं
स्वप्नात घडावयाच असतं
एकदा ठेच लागली म्हणून
तिथून परतायचं नसतं,
जीवनाच्या मार्गावर
अर्ध्यातच थांबायचं नसतं
जीवनात कितीही दु:ख आलं तरी
निराश व्हायचं नसतं
आपलं सुख आपल्यातच
शोधून काढायचं असतं
जीवनाच्या प्रवासात
0 comments:
Post a Comment